चिपळूण-कराड रेल्वेमार्गासाठी संघर्ष सुरूच……

0
253
बातम्या शेअर करा

चिपळूण -कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा चिपळूण- कराड रेल्वे प्रकल्प महाविकास आघाडीने मार्गी लावावा,अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी राज्याचे गृहराज्य मंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे केली आहे. या महत्वपूर्ण प्रकल्पासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे चर्चा करण्याबरोबरच पाठपुरावा करण्याचे आश्वासन देसाई यांनी मुकादम यांना दिले.

कोरोना पार्श्वभूमीवर शंभूराजे देसाई हे सातारा जिल्हयातील पाटण तालुक्याच्या दौऱ्यावर होते यावेळी शौकत मुकादम यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पाटण येथील डेरवण गावी जाऊन त्यांची भेट घेत चिपळूण-कराड रेल्वे मार्गाबाबत चर्चा केली . तसेच हा मार्ग दळणवळणासह येथील व्यापारी,उद्योजक सर्वसामान्य नागरिकांसाठी किती फायद्याचा आहे याकडेही त्यांचे लक्ष वेधले.तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिपळूण-कराड रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते.मात्र सत्ता गेल्यानंतर केंद्रानेही या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केले.हा मार्ग व्हावा,यासाठी गेली कित्येक वर्षे पाठपुरावा सुरू आहे.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह विविध पक्षातील नेते चिपळूण – कराड रेल्वे प्रकल्प मार्गी लावा लोकप्रतिनिधींकडेही या प्रकल्पाविषयी चर्चा केली जात आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे.या आघाडीने चिपळूण – कराड रेल्वे मार्ग मार्गी लावावा.त्यासाठी आपण पुढाकार घेऊन केंद्र तसेच राज्य शासनाचे लक्ष पुन्हा एकदा वेधून घ्यावे,अशी मागणी शौकत मुकादम यांनी केली. मुकादम यांनी या रेल्वे मार्गाबाबत वस्तुस्थितीची माहिती दिल्यानंतर देसाई यांनीही चिपळूण-कराड रेल्वे प्रकल्पाला गती देण्याबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले.यासाठी लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे चर्चा करू. महाविकास आघाडीमार्फत हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील.केंद्र सरकारकडे निधीसाठी पाठपुरावा केला जाईल,असेही मंत्री देसाई यांनी आश्वासन दिले.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here