चिपळूण – चिपळूण मध्यवर्ती बस स्थानकाचे काम बरेच दिवस बंद असून त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.सदरच्या होणाऱ्या प्रवाशांच्या त्रासाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दखल घेतली व राज्य परिवहन मंडळ कार्यालय ,चिपळूण येथे दहा दिवसात बंद पडलेले काम चालू करावे असे सांगण्यात आले. येत्या दहा दिवसात प्रवाशांचे होणारे हाल व बांधकाम चालू झाले नाही तर ,तीव्र आंदोलन करण्यात येईल असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आले यावेळी निवेदन देण्यात आले.
यावेळी प्रदेश अल्पसंख्यांकांचे उपाध्यक्ष शौकत मुकादम तालुकाध्यक्ष जयंद्रथ शेठ खताते विधानसभा क्षेत्र अध्यक्ष दादा साळवी, युवक जिल्हाध्यक्ष योगेश शिर्के, शहराध्यक्ष मिलिंद कापडी ,पंचायत समिती सदस्य अबु ठसाळे , अर्बन बँकेचे संचालक सतीश आप्पा खेडेकर, मनोज जाधव,युवक तालुका अध्यक्ष स्वप्नील शिंदे, युवक सरचिटणीस राहुल शिंदे,युवक शहराध्यक्ष सिद्धेश लाड, शहर सचिव अक्षय केदारी,विद्यार्थी तालुका अध्यक्ष वात्सल्य शिंदे, युवती शहर अध्यक्ष ऋतुजा चौगुले, उपाध्यक्ष जान्हवी फोडकर, प्रणिता शिंदे, सुरज जाधव,राज कदम व ऋतुज डाकवे आदी जण उपस्थित होते