बातम्या शेअर करा

गुहागर – ( मंगेश तावडे ) – राज्यात कोरोना संक्रमण होऊन रुग्ण वाढू नये यासाठी राज्य सरकारने अद्यापही शालेय कोचिंग क्लासेस किंवा अन्य कोणत्याही कोचिंग क्लासेसला परवानगी दिली नाही. मात्र असे असतानाही गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे मात्र राजरोसपणे कोचिंग क्लास सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते आहे. या कोचिंग क्लासेस मुळे जर कोरोना संक्रमणात वाढ होऊन रुग्ण वाढले तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

राज्य सरकारने अनलॉक 5 साठी महत्त्वाच्या गाईडलाईनस जारी केल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील हॉटेल रेस्टॉरंट बंद होते. मात्र अनलॉकच्या दिशेने पावले टाकत असताना आता 5 ऑक्टोबरपासून राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तर सिनेमा हॉल, स्वीमिंग पूल, मनोरंजन पार्कस, थिएटर सभागृहे 31 ऑक्टोबरपर्यंत बंदच राहणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे 31 ऑक्टोबर पर्यंत शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस बंदच राहणार आहेत.
शासनाचे असे आदेश असतानासुद्धा शुंगारतळी येथील एका ठिकाणी मात्र जुलै महिन्यापासून कोणतीही परवानगी नसताना असे क्लासेस सुरू असल्याचे उघडकीस होत आहे. त्यामुळे या क्लासेस वर कारवाई करून त्यांची मान्यता रद्द करावी अशी मागणी आता जोर धरत आहे.

शुंगारतळी येथील एका ठिकाणी आणि अनेक गावातील विद्यार्थी एकत्र येऊन क्लासेस सुरू असल्याच्या तक्रारी आमच्या कानावर आल्या याबाबत त्या क्लासेस वर कारवाई करण्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अजून माहिती गोळा करून जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सरपंच संजय पवार यांनी सांगितले.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here