नवी दिल्ली -देशावर कोरोनाचं संकट अजून कायम आहे. यामध्येच आता देशात कोरोनाच्या मृत्यूसंख्येने 1 लाखांचा टप्पा पार केला आहे. 24 तासात देशात कोरोनामुळे 1069 लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशभरात आता एकूण बळींची संख्या 1 लाख 842 वर जाऊन पोहोचली आहे. 24 तासात देशात 79,476 नवीन लोकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. देशातील कोरोना बाधितांची आकडेवारी आता 64,73,545 वर पोहोचली आहे. दरम्यान आतापर्यंत 54 लाख 27 हजार 706 रूग्ण बरे झाले आहेत.