देवरुख -देवरुख येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या ग्रामीण रुग्णालयात स्वतंत्र रक्तपेढी ची सुविधाही उपलब्ध करून देणेबाबत संबंधित विभागाला सूचना द्याव्यात अशी मागणी गाव विकास समितीच्या उपाध्यक्षा सौ अनघा कांगणे यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे मागील आठवड्यात केली आहे.
ग्रामीण भागात येन वेळेला रुग्णांना रक्ताची गरज भासल्यास ते उपलब्ध व्हावे यासाठी आता नव्याने रुग्णालय बांधकाम सुरू असताना रक्तपेढी बाबत तरतूद झाल्यास तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या रुग्णास त्याचा फायदा होईल.तरी आपण याबाबत लक्ष घालावे व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तशा सूचना द्याव्यात अशी मागणी सौ.कांगणे यांनी पत्राद्वारे केली आहे.