चिपळूण ; माजी आमदार रमेश कदम यांचा पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश

0
515
बातम्या शेअर करा

चिपळूण : चिपळूणचे नेते माजी आमदार रमेशभाई कदम यांचा आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कोकणचे नेते खासदार सुनील तटकरे, चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष बाबाजीराव जाधव, दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम, प्रदेश युवक राकेश चाळके, युवक राष्ट्रवादी काँग्रेस रत्नागिरी जिल्हाध्यक्ष योगेशजी शिर्के, खेड ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दशरथ दाभोळकर, पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे, मंडणगड राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश शिगवण व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला.

रमेश कदम यापूर्वी भारतीय जनता पार्टीत गेले होते. मात्र लोकसभा विधानसभा निवडणुकांपूर्वीच ते भारतीय जनता पार्टी मधून काँग्रेस मध्ये गेले. त्यानंतर काही काळ त्यांच्याकडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. मात्र कोरोनाच्या काळामध्ये नेमक्या काय घडामोडी घडल्या ते लक्षात आलेले नाही. रमेश कदम पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजेच आपल्या मूळ पक्षात परत आले आहेत. खासदार सुनील तटकरे यांचे विश्वासू सहकारी आहेत. त्यांची पक्षापलिकडची मैत्री सर्वश्रुत आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here