रत्नागिरी – रत्नागिरीजवळील खेडशी गावातील मैथिली प्रवीण गवाणकर या सोळावर्षीय तरुणीच्या खूनाप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपास करून या प्रकरणी निलेश उर्फ ऊक्कु प्रभाकर नागवेकर वय ३५ याला अटक केली आहे.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मोडा जंगलांमध्ये मैथिलीहीचा खुन झाला होता. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.परंतु यामध्ये आरोपीचा सुगावा लागत नसल्याने हे प्रकरण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे जानेवारी २०२० मध्ये देण्यात आले होते. मैथिली गवाणकर ही मोडा जंगलांमध्ये बकऱ्या चरविण्यासाठी गेली असता कोणीतरी अज्ञात इसमाने डोक्यात जड वस्तूने मारून तिला जीवे ठार मारले होते.हा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे आल्यानंतर पोलीस निरीक्षक शिरीष सासणे यांनी याप्रकरणी पोलीस पथके स्थापन करून त्यांना सूचना दिल्या होत्या.गुन्हा दाखल करून एक वर्षाचा कालावधी होऊन देखील आरोपींचा थांगपत्ता लागत नव्हता तरी देखील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने खेडशी गावातील स्थानिक लोकांशी संपर्क व जवळीक साधून गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेऊन खेडशी भंडारवाडी येथील राहणारा निलेश उर्फ ऊक्कु प्रभाकर नागवेकर याला गुन्हय़ाच्या कामी अटक करण्यात आली आहे.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग,अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधीक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिरीष सासणे,पोलीस निरीक्षक सुरेश कदम,स.पो.फौ. तानाजी मोरे,पांडुरंग गोरे,पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत बोरकर ,राजू भुजबळराव,मिलिंद कदम,सुभाष भागणे,शांताराम झोरे,नितीन डोमणे,अपूर्वा बापट,चालक संजय जाधव,पोलीस नाईक अरुण चाळके,रमीझ शेख,अमोल भोसले,बाळू पालकर,गुरू महाडिक यांनी पार पाडली.