खेड -खेड मधील एक प्रशासकीय अधिकारी अँटीकरप्शनच्या जाळ्यात सापडला आहे.असंख्य जणांकडे काम पूर्ण करून देण्यास पैशाची मागणी करणाऱ्या या अधिकाला स्थानीक नागरिकही कंटाळले होते.. शेवटी काल रात्री खेड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आणि भरणे ग्रामपंचायतीचा प्रशासक म्हणून काम पाहणाऱ्या या अधिकाऱ्याला एका डॉक्टरचे काम करण्यासाठी ७००० रुपयांची लाच घेताना खेड रेल्वे स्टेशन परिसरपासून जवळ हायवे शेजारील हॉटेलमध्ये लाच घेताना पकडण्यात आले आहे..रात्री या अधिकाऱ्याला लाच लूचपत विभागाने ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू केली आहे.
















