मुंबई -जगभरात कोरोनाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. जगातील कोट्यावधी लोक कोरोना प्रतिबंधक लस कधी येणार यावर लक्ष ठेवून आहेत. प्रसिद्ध जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीने कोरोना प्रतिबंधक लसीच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील चाचणीला सुरुवात केली आहे. या लसीने चाचणीतील पहिले दोन टप्पे यशस्वीरित्या पार केले आहेत.
आता कोरोनावरील या लसीचा प्रयोग हा 60 हजार जणांवर केला जाण्याची शक्यता आहे. यासाठी अमेरिकेसह जगातील 200 हून अधिक जागांची निवड करण्यात आली असून या ठिकाणचे स्वयंसेवक सहभागी होणार आहेत.
जॉन्सन अॅन्ड जॉन्सन’ची कोरोना लस तिसऱ्या टप्प्यात पोहोचणारी अमेरिकेची चौथी लस ठरली आहे. तर जगभरातील दहावी कंपनी आहे. ही कंपनी NOT FOR PROFIT या तत्त्वावर ही लस तयार करत आहे. जर या चाचणीचे टप्पे पुढे भविष्यातही अशाचप्रकारे यशस्वी ठरले तर येत्या 2021 पर्यंत या लसीला परवानगी मिळू शकते असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.