चिपळूण – कोरोनाच्या संकटात उत्तम कामगिरी बजावल्याबद्दल शिक्षक दिनानिमित्त येथील पदवीधर शिक्षक यशवंत पेढाबंकर यांचा लायन्स क्लब ऑफ चिपळूण गॅलेक्सी तर्फे सत्कार करण्यात आला. या सत्काराने आपण भारावून गेलो आहेत, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाने देशात हाहाकार उडवला आहे. चिपळुनातही कोरोना बाधितांची संख्या कमी-जास्त होताना दिसत आहे. मात्र, या कालावधीत पदवीधर शिक्षक यशवंत पेढांबकर यांनी पोलीस मित्र म्हणून उत्तम कामगिरी बजावली आहे. तसेच यानंतर कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांना कडक स्पेशल चहाचा आस्वाद दिला आहे. याबद्दल चिपळूण पोलिसांनी यशवंत पेढाबकर यांच्या सेवेबद्दल समाधान व्यक्त केले आहे. या कामगिरीची दखल घेऊन लायन्स क्लब ऑफ चिपळूण गॅलेक्सी ने यशवंत पेढाबंकर यांचा शिक्षक दिनानिमित्त विशेष सत्कार केला आहे.
यावेळी लायन्स क्लब ऑफ चिपळूण गॅलेक्सीच्या उपाध्यक्षा प्रांजल गुंजोटे, कॅबिनेट ऑफिसर ला. प्राची जोशी, सेक्रेटरी ला. डॉ. शमीना परकार, प्रेसिडेंट ला. एकता मुळ्ये आदी उपस्थित होते. या सर्वांचे यशवंत पेढाबंकर यांनी आभार मानले आहेत.