गुहागर – (विशेष प्रतिनिधी ) कोरोना संक्रमण एकीकडे वाढत असतानाच गुहागर तालुक्यातील 4 कोरोना पॉझिटिव रुग्णांनी शृंगारतळी ते गुहागर असा प्रवास चक्क एसटी बसने प्रवास केल्याने सर्वत्र खळबळ माजली असून पॉझिटिव्ह रुग्ण असतानासुद्धा एसटी बसने प्रवास केल्यामुळे या चार रुग्णांवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
गुहागर मधील एका वाडीतील तेरा सदस्य हे काल शुंगारतळी येथील अली पब्लिक स्कूल येथील अँटीजेन सेंटरला टेस्ट करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यातील 9 जणांचे रिपोट हे निगेटिव्हआले. तर चार जण हे पॉझिटिव आले. यावेळी शासनाच्या नियमाप्रमाणे जो कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असेल त्याला नेण्यासाठी सर्वप्रथम ॲम्बुलन्सचा पर्याय असतो. मात्र या तेरा जणांपैकी अनेकांनी असे सांगितले की आम्ही नऊ जण सर्वप्रथम निगेटिव्ह आहोत त्यामुळे आम्हाला आमच्या घरी सोडण्याची व्यवस्था करा आणि मग पॉझिटिव्ह चार पेशंट घेऊन जाण्यासाठी ॲम्बुलन्सचा उपयोग करा त्यांच्या मागणीनुसार सेंटरचे वरिष्ठ यांनी त्यांच्या मागणीचा आदर करत सर्वप्रथम नऊ पेशंटना गुहागरला सोडण्यास परवानगी दिली. त्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा परत येत असताना ॲम्बुलन्स मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ऍम्ब्युलन्स उपलब्ध होत नव्हती. मात्र त्याच वेळी त्यांनी खेड तालुक्यातील 108 ची सेवा त्यांना उपलब्ध करून देण्यात येत होती. ती ॲम्बुलन्स येण्यासाठी मात्र बराच वेळ जाणार होता यावेळी मात्र उरलेल्या चार पॉझिटिव पेशंट होते त्यांनी आम्ही स्वतःची खाजगी सेवा उपलब्ध करून जातो असे सांगितले या चार जणांनमध्ये एक महिला व 3 पुरुष रुग्ण होते.व त्यांनी अली पब्लिक सेंटर मधून शृंगारतळी येथील बस स्टॅन्ड कडे प्रयाण केले. त्यानंतर त्यांनी शुंगारतळी मध्ये आल्यावर एक व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. त्या व्हिडिओमध्ये ते असे सांगत आहेत की आम्ही अली पब्लिक स्कूल ते शृंगारतळी बस स्टॉप चालत येत आहोत.
त्याचवेळी शुंगारतळी सरपंच संजय पवार हे वेळंब फाटा येथे त्या पॉझिटिव रुग्णांना भेटले त्यावेळी त्यांना त्यांची विचारपूस केली की तुम्ही पॉझिटिव्ह रुग्ण असताना आता कसे जाणार ? त्यावेळी त्यांनी सांगितले की आमची खाजगी गाडीची व्यवस्था झाले आम्ही जाणार आहोत. गुहागर येथील हे चार ही पॉझिटिव्ह रुग्ण शुंगारतळी येथील बस स्टॉप वर काल संध्याकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान थांबले होते. त्याचवेळी चिपळूण कडून गुहागर जाणारीकडे जाणारी एक बस आली त्या बसमधून एक प्रवासी खाली उतरला मात्र त्याच वेळी हे चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण त्या बसमध्ये चढले आम्ही बस चालकाला सांगण्यासाठी पाठलाग केला मात्र तोपर्यंत बस गुहागरकडे मार्गस्थ झाली.
एकीकडे हे चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण एसटीने गुहागरकडे गेले असतानाच सोशल मीडियावर मात्र हे चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण चालत गेले. असा मेसेज व्हायरल होतोय खरोखरच विचार केला तर हे चार रुग्ण चालत जातील का ? हा एक एक प्रश्न आहे. मात्र अशा प्रकारे मेसेज व्हायरल करून कोव्हिडं योद्ध्यांचा अपमान केला जात असल्याची खंतही अनेक कोविड योद्धानी व्यक्त केली. गेले सहा महिने जे कोविंड योद्धा आपल्या जीवावर उदार होऊन काम करतात त्यांना अशा प्रकारे बदनाम करण्याचं काम थांबवावे अशी मागणी त्यांनी केली.