खेड ; भरणेनाका येथे तिहेरी अपघात; सुदैवाने मनुष्यहानी नाही

0
343
बातम्या शेअर करा

खेड – मुंबई गोवा महामार्गावरील भरणे जाधववाडी नजीक रुग्णवाहिका ,हुंदाई असेन्ट, आणि मारुती एर्टिगा या तीन वाहनांमध्ये विचित्र अपघात झाला. सुदैवाने या अपघातात मनुष्यहानी झालेली नाही मात्र वाहनांचे नुकसान झाले आहे.

चिपळूण येथील एका रुग्णाला घेऊन एक रुग्णवाहिका मुंबईकडे निघाली होती. ती रुग्णवाहिका कळंबणी रुग्णलयाजवळ पोहचली असता रुग्णवाहिकेतील रुग्णाचे निधन झाले. त्यामुळे ती रुग्णवाहिका पुन्हा चिपळूणकडे वळविण्यात आली. परतीच्या मार्गावर असलेली रुग्णवाहिका भरणे जाधववाडी येथील पेट्रोल पंपाजवळ आली असताना समोरून ट्रॅकला ओव्हरटेक करत सुसाट वेगाने येणाऱ्या हुंदाई असेन्ट कारने रुग्णवाहिकेला धडक दिली. दरम्यान मुंबईकडून चिपळूणकडे भरधाव वेगाने निघालेली मारुती एर्टिगा कार अपघातग्रस्त रुग्णवाहिकेवर येऊन आदळली.
या विचित्र अपघातात सुदैवाने कोणीही गंभीर जखमी झाले नाही. मात्र तिन्ही वाहनांचे नुकसान झाले. पोलीस या प्रकणी अधिक तपास करत आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here