बातम्या शेअर करा

चिपळूण -मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थे बाबत शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी दिलेल्या बोंबाबोंब आंदोलन इशाऱ्याची दखल खासदार विनायक राऊत यांनी घेतली असून राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता विनय देशपांडे यांना या संदर्भात तात्काळ कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी पत्राद्वारे केल्या आहेत.मंत्री महोदयांच्या बैठकीत आपण स्वतः आश्वासन देऊन देखील कोणतीच कार्यवाही केली नाहीत असेही त्यांनी सुनावले आहे.

चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील तोडून -मोडून ठेवली बाजारपेठ तसेच येथील व्यापारी नागरिकांना अद्याप न मिळालेला मोबदला आणि चिपळूण परशुराम ते आरवली या मार्गाची झालेली दुरावस्था या बाबत शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी आवाज उठवला असून महामार्गावर थेट बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.या संदर्भात त्यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी तसेच खासदार विनायक राऊत यांना पत्र पाठवले होते.

संदीप सावंत हे एक आक्रमक शिवसैनिक आहेत.त्यांनी एखादा विषय हाती घेतला तर तडीस नेल्याशिवाय ते शांत बसत नाहीत त्यामुळे त्यांच्या या आंदोलन इशाऱ्याने प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे.तर शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी या विषयाची तातडीने दखल घेत प्रशासनाला स्पष्ट शब्दात सुनावले आहे.सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत मुंबई गोवा महामार्ग गणपती उत्सवापूर्वी खड्डेमुक्त करू असे आश्वासन आपण स्वतः दिले होते परंतु अद्यापपर्यंत कोणतीच कार्यवाही झालेली नाही.असे मुख्य अभियंता विनय देशपांडे यांना खा.राऊत यांनी सुनावले आहे.
आता शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.तेव्हा विनाविलंब महामार्ग बाबत कार्यवाही करावी आणि केलेल्या कार्यवाही बाबत माझ्याकडे अहवाल पाठवावा आशा स्पष्ट सूचना खासदार विनायक राऊत यांनी मुख्य अभियंता राष्ट्रीय महामार्ग कोकण विभाग यांना दिल्या आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here