गुहागर – गुहागर तालुक्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणत सापडत असल्याने व गेल्या तीन दिवसात गुहागर तालुक्यात जवळपास 94 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे गुहागर तालुक्यात चिंतेचे वातावरण या पार्श्वभूमीवर तालुक्यातील महत्वाची अशी शुंगारतळी बाजारपेठ आज पासून 4 दिवस बंद करण्याचा निर्णय व्यापारी संघटना व ग्रामस्थ यांच्या झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला.त्यामुळे आता 11 तारखेपासून 14 पर्यत संपूर्ण शुंगारतळी बाजारपेठ बंद रहाणार आहे.
गुहागर तालुक्यात मागील तीन दिवसात 94 पॉसिटीव्ह रुग्ण सापडले या मध्ये शुंगारतळी मध्ये ग्रामपंचायत , व्यापारी दुकान ,व एका बँक मध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून शृंगारतळी बाजारपेठ दिनांक 11 ते 14 सप्टेंबर दरम्यान बंद राहणार असून या कालावधीत सर्व व्यापारी व त्यांचे कर्मचारी यांनी
अँटिजेन टेस्ट करावयाची आहे. जो व्यापारी किंवा कर्मचारी ही तपासणी करणार नाही त्याला दुकान उघडायला परवानगी देण्यात येणार असा ही निर्णय या चर्चेत घेण्यात आला.कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे एकीकडे तालुक्यात चिंतेचे वातावरण असताना अद्यापही काही गावात मुंबईकर चाकरमानी केव्हा येतात आणि केव्हाही जातात यांच्याकडे व्यवस्थित ग्राम कृती दलालामार्फत लक्ष दिले जात नसल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली. जर वेळीच हे रोखलं नाही तर तालुक्यातील कोरोनाची स्थिती याहीपेक्षा भयानक होईल असे मत व्यक्त केले जाते.