गुहागर – गुहागर तालुक्यातील मुंढर येथे शिरबारवाडी येथे पत्र्याच्या शेड मध्ये सुरू असलेल्या जुगार अड्डयावर गुहागर पोलिसांनी धाड टाकत सहा जणांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.डीवायएसपी नवनाथ ढवळे यांच्या मार्गदशनाखाली ही कारवाई गुहागर पोलिसांनी केेली.
येथे अवैधरित्या 52 पत्त्यांचा खेळ सुरू असल्याची माहिती गुहागर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी ही कारवाई केल्याचे समजते.या कारवाईत 86 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे,यामध्ये गाड्यांचा देखील समावेश आहे. गुन्हा दाखल झालेल्या लोकांची नावे पुढील प्रमाणे – संजय ठसाळे (चिपळूण) लवेश विचारे (चिपळूण -पाग) देवेंद्र महाजन (चिपळूण- खेंड)
शैलेश पावसकर (गुहागर – कारूळ) संदीप कदम(गुहागर – चिखली,बौद्धवाडी) बाबू राठोड (चिपळूण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असुन गुहागर पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्वच थरातून कौतुक होत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हेड कॉ. नलावडे करत आहेत.