चिपळूण- मागील काही महिन्यांपासून कोरोनाच्या साथीमुळे जगभरात आर्थिक मंदी पसरली असून ह्याचा फटका उद्योगधंदे, व्यवसायांना बसला आहे.ह्यामुळे अनेकजण बेरोजगार झाले आहेत तर असंख्य कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आर्थिक सहाय्य करणाऱ्या पतसंस्था, फायनान्स कंपन्यांना त्यांच्याकडून आर्थिक सहाय्य घेतलेल्या कर्जधारक ग्राहकांकडून मासिक हप्त्यांकरिता (ई एम आय)तगादा लावू नये,त्यांच्यावर दबाव आणू नये असे आदेश असतानाही काही अर्थ साहाय्य करणाऱ्या कंपन्याकडून कर्जधारक ग्राहकांना त्यांच्या वसुली प्रतिनिधींकडून त्रास दिला जात होता ह्यात बजाज फायनान्स ह्या कंपनीचा प्रामुख्याने सहभाग असल्याने शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षच्या पदाधिकऱ्यांनी येथील बजाज फायनान्सच्या कार्यालयातील प्रमुख अधिकाऱ्यांना राज्य शासनाच्या सदर आदेशाची अंमलबजावणी करावी व कर्जधारक ग्राहकांना कोणताही त्रास न देऊ नये तसेच त्यांना वेठीस धरू नये तसेच कॅशबॅक योजनेतील रक्कम ग्राहकांना द्यावी अशी सूचना सदर निवेदनाद्वारे करण्यात आली.सदर निवेदनाची गांभीर्याने दखल न घेतल्यास शिवसेना पद्धतीचा अवलंब करावा लागेल असा इशारा सदर निवेदनाद्वारे कंपनीस देण्यात आला.
सदरचे निवेदन शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हासंपर्क प्रमुख संतोष होळम्ब व जिल्हाप्रमुख संतोष सुर्वे यांच्या सूचनेनुसार, मार्गदर्शनानुसार कक्षतालुकप्रमुख सुरज कदम,कक्ष कार्यालयप्रमुख अविनाश सावंत,उपतालुका प्रमुख विजय जाधव,उपशहरप्रमुख उमेश गुरव,कक्ष विभागप्रमुख प्रकाश नलावडे,उपविभाग प्रमुख सौरभ फागे,मोरेश्वर वैद्य,अंबादास माळी आदी पदाधिकारी तर प्रदीप कांबळी(शाखाधिकारी),अजिंक्य कोलगे(कलेक्शन मॅनेजर),अक्षय जाधव(कलेक्शन एरिया मॅनेजर)हे कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.या वेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचारी वर्गाने राज्य शासनाचे आदेश येईपर्यंत कोणतीही कर्जवसुली व अतिरिक्त व्याजबाबत कर्जधारक ग्राहकांना वेठीस धरले जाणार नाही व ग्राहकांना कोणताही त्रास दिला जाणार नाही असे आश्वासन ग्राहक संरक्षण कक्षच्या पदाधिकऱ्यांना दिले.