रोटरी क्लब चिपळूणने त्या कार्यक्रमाची पुसटशी कल्पना दिली नाही, याचा खेद वाटतो- सौ स्वप्ना यादव

0
226
बातम्या शेअर करा

चिपळूण -कोरोनाच्या संकटात कामथे उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या उपचारासाठी मुलभूत सोयीसुविधेच्या दृष्टीने प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी केलेल्या आवाहनानुसार चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने रोटरी क्लब चिपळूणच्या नावाने ३ लाख रुपयांचा धनादेश दिला आहे. तसेच अन्य संस्थांसह दानशूर व्यक्तिंनीही अर्थसहाय्य केले आहे. या सर्वांच्या सहकार्याने कामथे उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध केलेल्या सोयी सुविधांबाबतची माहिती देण्यासाठी रोटरी क्लब चिपळूणने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. मात्र, याची पुसटशी कल्पना चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेला दिली नाही, याचा खेद वाटतो, अशी प्रतिक्रिया या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी दिली आहे.

यावेळी त्या पुढे म्हणाल्या की, गेल्या काही महिन्यांपासून कोरोना विरोधात लढाई सुरू आहे. सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनापासून दूर असलेल्या चिपळूण तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर येथील प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी कामथे उपजिल्हा रुग्णालया मूलभूत सोयी- सुविधांनीयुक्‍त असले पाहिजे, या भावनेतून सहकारी संस्था व दानशूर व्यक्तींना अर्थसहाय्यासाठी आवाहन केले होते. यानुसार चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेला देखील आवाहन केले होते. यानुसार संस्थेने प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देत रोटरी क्लब चिपळूणच्या नावाने ३ लाख रुपयांचा धनादेश दिला आहे. तसेच अन्य सहकारी संस्था व दानशूर व्यक्तीने देखील अर्थसहाय्य केले असल्याची माहिती समोर आली आहे. यातून कामथे उपजिल्हा रुग्णालयात दोन कोविड वार्ड सुसज्जतेसह उपकरणे दिली जाणार आहेत. याची माहिती देण्यासाठी रोटरी क्लब चिपळूणने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. मात्र, ही पत्रकार परिषद घेतांना एक देणगीदार म्हणून आम्हाला याची माहिती देणे अपेक्षित होते. मात्र, रोटरी इंटरनॅशनल म्हणून राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या चिपळूण शाखेच्या सदस्यांनी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेला पुसटशी कल्पना दिली नाही, याचा खेद वाटतो, असे परखड मत सौ. स्वप्ना यादव यांनी मांडले आहे.

प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या आवाहनानुसार लोकसहभागातून होत असलेल्या उपक्रमाससंदर्भातील माहिती प्रांताधिकारी यांनी देणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही तर या उलट रोटरी क्लबने पत्रकार परिषद घेऊन काही पथ्ये पाळली नाहीत, याची खंत वाटत असल्याचे स्वप्ना यादव यांनी नमूद केले आहे. तर या प्रकाराबाबत प्रशासनाला लेखी पत्र देऊन नाराजी व्यक्त केली आहे. तर या उपक्रमातील सहभागाबद्दल चिपळूण नागरीचा उल्लेख व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here