दापोली – दापोली तालुक्यातील जालगाव कुंभारवाडी येथे तब्बल सात सापाची पिल्ले सर्पमित्र किशोर निवळकर यांनी या बिनविषारी सापाच्या पिल्लांना जिवंत पकडून त्यांना वाचवल्या बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
अनेकजण साप म्हटले की मारतात मात्र अशा स्वरूपाचे हे बिनविषारी साप आहेत. ग्रामीण भाषेत त्यांना एका मागोमाग येणाऱ्या मण्यार असे म्हणतात मात्र यांचे शास्त्रीय नाव ‘नानेटी’ आहे. त्याचे खाद्य बेडुक सरडे,उंदीर घुशी हे आहे म्हणूनच हा यांचा वावर घर परसावात असावा. हरणटोळ हा हिरव्या रंगाचा निमविषारी साप आहे. त्याचे झाडावरील प्राणी हे आहे मात्र ग्रामीण भाषेत हरणटोळ हिरव्या रंगाच्या सापाला नानेटी म्हणतात अशी माहिती जालगाव कुंभार वाडी परिसरात राहणारे सर्पमित्र किशोर निवळकर यांनि दिली.सर्पमित्र किरण करमरकर यांच्या टीममध्ये आपण सर्पमित्र म्हणून काम करत असल्याचे सांगितले.