बातम्या शेअर करा

खेड – बनावट ई -पास प्रकरणी गुहागर मनसेचा पदाधिकारी राकेश सुर्वे याला अटक झाल्याची बातमी वाचली आणि अतिशय दुःख झाले. अशी खंत वैभव खेडेकर यांनी व्यक्त केली. राकेश सुर्वे यांचा गुहागर तालुका मनसेशी कोणताही संबंध नसून तो बोगस पदाधिकारी असल्याचा दावा वैभव खेडेकर यांनी केला आहे.

कोरोना संक्रमणाच्या काळात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी राज्य शासनाने ई-पास सवलत सुरू करून दिली होती. मात्र ई- पास मध्ये बोगस ई-पास मिळत असल्याची तक्रार मनसेचे संदीप देशपांडे यांनी केली होती. त्यामुळे हा विषय खूपच गाजला होता. मात्र या बोगस ई-पास प्रकरणी नाशिक पोलिसांनी मनसेचा पदाधिकारी असणारा गुहागर तालुक्यातील पडवे येथील राकेश सुर्वेला अटक केल्याने एकच खळबळ माजली आहे.

ज्या मनसेने कोरोनाच्या पाच महिन्याच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या सगळ्या सुविधा घरपोच देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. या कालावधीमध्ये कुठलाच राजकीय पक्ष त्याचे पदाधिकारी आणि त्यांचे नेते रस्त्यावर उतरून काम करत नव्हते. ज्या राजकीय पक्षांना भरभरून मतदान महाराष्ट्रातील जनतेने केले त्यांचे नेते त्यांचे कार्यकर्ते कोरोना कालावधीमध्ये महाराष्ट्रात कुठेही दिसले नाहीत. ज्यांचं सरकार महाराष्ट्रामध्ये हे सर्व स्तरावर अपयशी ठरलेले आहे. खास करून कोकणी जनतेवरती या सरकारने भरपूर अन्याय केलेला आहे. परप्रांतीयांना राज्यशासनाने खर्च करून त्यांच्या राज्यांमध्ये पाठवलं परंतु कोकणी जनतेला चालत त्यांच्या गावाला यावं लागलं त्यांना ई -पासची सक्ती करावी लागली. गणपती उत्सवामध्ये 2 हजार रुपयांचे तिकीट काढून त्यांना कोकणामध्ये पोहोचावे लागले. कोकणातील रस्त्यांची बिकट अवस्था शासनाचे अनेक निर्बंध यामुळे कोकणी माणूस फार मेटाकुटीला आलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये मनसेने जनतेशी बांधिलकी जपत आपले काम सुरू ठेवले मात्र ज्या राकेश सुर्वेचा दुरान्वये संबंध गुहागर मनसे’ची नाही. हा गेल्या दोन वर्षापासून कुठलाही संबंध गुहागर मनसेशी नसलेला राकेश सुर्वे तो गुहागर तालुक्यामध्ये कायमस्वरूपी राहत नसून मुंबई मध्ये राहतो त्यांनी लावलेला विद्यार्थी सेना संपर्कप्रमुख सचिव हे बोगस पद असून त्याला गुहागर मनसेमध्ये कुठले स्थान नाही त्यामुळे त्याचा आणि मनसेचा कुठलाही संबंध नाही.असे प्रसिद्धीपत्रक वैभव खेडेकर यांनी काढले आहे.

तरी यासंदर्भात सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या कानावर हा संपूर्ण विषय घातलेला आहे येणाऱ्या कालावधीमध्ये राजसाहेब याच्यावरती ठोस निर्णय घेतील आणि कारवाई करतील. अशी माहिती वैभव खेडेकर,सरचिटणीस आणि नगराध्यक्ष,
महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी दिली.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here