दापोली – एकीकडे संपूर्ण राज्यभर समोर उभे राहिलेले कोरोना रोगाचे संकट, सर्व ठिकाणी सुरू असलेले लॉक डाऊन, त्यातच येऊ घातलेल्या प्रत्येक सणांमध्ये सण साजरे करण्यासाठी पडलेल्या मर्यादा परंतु त्यातही शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करीत सामाजिक हित जोपासण्याच्या भावनेतून रक्तदान हे श्रेष्ठदान लक्षात घेऊन ओम साईराम मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव दापोलीचा राजा मंडळाने रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पाडले.
गेली आठ वर्ष हे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवून आपली वाटचाल प्रगतीकडे करीत आहे. मंडळाचे उत्सव साजरे करण्याचे यंदाचे नववे वर्ष असून कार्यक्रम साजरा करण्यासाठी पडलेल्या मर्यादा लक्षात घेता तरीही हे मंडळ विविध कार्यक्रमांमधून सामाजिक हित जोपासण्याचे काम करीत आहे. आज दिनांक 23 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अनेक रक्तदात्यांनी स्वतःहून पुढे येत रक्तदान करून समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
दरवर्षी रक्तदान शिबिराकरिता भक्तश्रेष्ठ कमलाकर पंत वालावलकर रुग्णालय डेरवण यांनी मंडळाला वेळोवेळी सहकार्य केले असून, दापोलीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने जोपासलेले समाजहित यावर विश्वास ठेवून जनतेने आज पर्यंत भरभरून या मंडळाला दाद दिली आहे,
![](https://pragatitimes.in/wp-content/uploads/2020/08/IMG-20200815-WA0012-1024x748-1.jpg)