दापोली -डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वसतिगृहात कोरोनाचा शिरकाव झाल्याने खळबळ उडाली आहे. या वसाहती मधील एका कर्मचाऱ्याच्या घरातील डॉक्टर सुकन्या दोन दिवसांपूर्वी अँटिजेंन टेस्ट मध्ये पॉझिटीव्ह अली आहे. तिच्या कुटूंबीयांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. खबरदारीचा व आरोग्य सुरक्षेचा उपाय म्हणून वसाहतीमधील ती बिल्डिंग प्रशासनाने कॅन्टोन्मेंट केली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सामान नागरिकांना एक निमशासकीय वसाहतीला वेगळा न्याय का? असा सवाल उपस्थित सूज्ञ नागरिकांकडून केला जात आहे.