मुंबई -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता आणली जात आहे. त्याचाच भाग म्हणून आता केंद्र सरकारने देशभरात कुठेही सामान आणि प्रवाशी वाहतुकीसाठी ई पासची गरज लागणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करत मार्गदर्शक सूचनांची दखल घेत सर्व निर्बंध काढून टाकले आहेत, असे स्पष्ट केले आहे.
“केंद्राने जाहीर केलेल्या अलीकडील मार्गदर्शक सूचनांची आम्ही दखल घेतली आहे. वस्तू आणि लोकांच्या आंतरराज्यीय आणि राज्यातंर्गत हालचालींवरील सर्व निर्बंध काढून टाकण्यात आले आहेत. दरम्यान याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल,” असे ट्विट अनिल देशमुख यांनी केले आहे.