गुहागर – गुहागर येथील चंद्रभागा गॅस एजन्सी या एजन्सीच्या मनमानी कारभाराने तालुक्यातील ग्रामस्थ कंटाळले असुन याच एजन्सीने आता तालुक्यातील महत्वपूर्ण अशा पाटपन्हाळे येथिल शालेय संकुलात विनापरवानगी गोडावून केल्याने एकच खळबळ माजली आहे.
गुहागर तालुक्यात असलेली ही नामवंत गॅस एजन्सी याच गॅस एजन्सी मधून तालुक्यातील अनेक ठिकाणी गॅस सिलेंडर पोचवले जातात. मात्र या गॅस एजन्सीच्या बाबतीत ग्राहकांच्या अनेक तक्रारी आहेत. या गॅस एजन्सीकडून ग्राहकांना वेळेत गॅस सेवा उपलब्ध करून दिली जात नाही. कार्यालयात फोन केला तर फोन उचलत नाही. अशा अनेक तक्रारी या गॅस एजन्सीच्या अखिल भारतीय ग्राहक संरक्षण मंचाकडे करण्यात आल्या आहेत. तर याच गॅस एजन्सीच्या माध्यमातून ग्राहकांकडून 40 रुपये जादा सिलेंडर घरी पोचण्याच्या आज सुद्धा घेतले जात असल्याची चर्चा असून याबाबत विचारणा केली असता आम्ही रीतसर पावती वर लिहून देतो. तुम्ही आमची तक्रार महसूल विभागात करा. अशी उत्तरे दिली जातात. तरी महसूल विभागाने खरोखरच या गॅस एजन्सीला ग्राहकांच्या घरी सिलेंडर पोचवण्यासाठी 40 रुपये जादा आकारणी करण्याची मुभा दिली आहे.? का याचा खुलासा होणे गरजेचे आहे. अशी मागणी आता ग्राहक करू लागले आहेत.
आता या गॅस एजन्सीने पाटपन्हाळे येथील महाविद्यालयाच्या आवारातच गॅस एजन्सीचा गोडाऊन केल्याने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून भरवस्तीत गॅस एजन्सीचे गोडाऊन केल्यामुळे पाटपन्हाळे येथील नागरिकांचा जीव टांगणीला लागला असून पाटपन्हाळे ग्रामपंचायत यावर कोणती भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
गॅस एजन्सीचे गोडाऊन हे शहरापासून आणि नागरी वस्तीपासून दूर असावे असा नियम आहे. मात्र चंद्रभागा गॅस एजन्सी आपला मनमानी कारभार करून पाटपन्हाळे येथील शिक्षण संस्थेचे आवारातच दोन गॅस भरलेले सिलेंडर असलेले ट्रक कोणाची परवानगी न घेता उभी केल्याने एकच खळबळ माजली. यासंदर्भात या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी चंद्रभागा गॅस एजन्सीला हे दोन ट्रक गॅस सिलेंडर ने भरलेल्या ते तात्काळ हटवण्याची मागणी केली. मात्र एजन्सीने अद्यापही त्याकडे दुर्लक्ष केले गेल्याचे बोलले जात आहे. नागरिकांच्या वस्तीतच दोन गॅस सिलेंडर भरलेले ट्रक उभे असल्याने या ठिकाणी काही विपरीत परिणाम घटना घडली तर त्याला सर्वस्वी जबाबदार चंद्रभागा गॅस एजन्सी असेल असे येथील नागरिकांमधून बोलले जात आहे.