चिपळूण – कोकणातील गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गणपती स्पेशल 162 ट्रेन सोडण्याचं नियोजन केले आहे. यातील काही ट्रेन ह्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणार आहेत.मात्र या गाड्या किती चाकरमानी किती प्रतिसाद देणार यांची चिंता आता लागली आहे.
15 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रत्नागिरीला जाणारी पहिली ट्रेन रात्री साडे आठ वाजता सुटली. मात्र या पूर्ण रेल्वेत फक्त 6 प्रवासी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून बसले तर ठाणे आणि पनवेल येथून 25 प्रवाशांनीच आरक्षण केले होते. 18 डब्यांच्या या गाडीत काल फक्त 30 प्रवाशीच होते या ट्रेन्सला सध्यातरी अत्यल्प प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे कोकणातील जनतेच्या बळावर लाखो रुपये कमवणारी या रेल्वेला चाकरमानी नक्की किती प्रतिसाद देतील हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल.