मुंबई -गणपती उत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी १६२ पूर्णपणे आरक्षित विशेष गाड्या – 15 जून पासून आरक्षण सुरू करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस / लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड / कुडाळ / रत्नागिरी दरम्यान रेल्वेगाडी १६२ विशेष गाड्या चालविण्यात येतील. गणपती उत्सव २०२० दरम्यान प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येतील. तपशील खालीलप्रमाणे आहेतः
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-19 शी संबंधित सर्व नियमांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
*१. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- सावंतवाडी रोड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (१६ फे-या) ०११०१ विशेष* छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दि. १५.८.२०२० ते २२.८.२०२० पर्यंत दररोज २३.०५ वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोडला दुसर्या दिवशी सकाळी ९.३० वाजता पोहोचेल. ०११०२ विशेष* सावंतवाडी रोड येथून दि. १६.८.२०२० ते २३.८.२०२० पर्यंत दररोज १०.१० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे त्याच दिवशी २१.४० वाजता पोहोचेल थांबे*: दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.
*२. लोकमान्य टिळक टर्मिनस – कुडाळ – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (१६ फे-या)* *०११०३ विशेष* लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. १५.८.२०२० ते २२.८.२०२० पर्यंत दररोज २३.५० वाजता सुटेल आणि कुडाळला दुसर्या दिवशी सकाळी १०.३० वाजता पोहोचेल. *०११०४ विशेष* कुडाळ येथून दि. १६.८.२०२० ते २३.८.२०२० पर्यंत दररोज १२.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे २३.०० वाजता पोहोचेल. *थांबे* : ठाणे, पनवेल, रोहा, माणगांव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग
*३. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – सावंतवाडी रोड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (१६ फे-या)* *०११०५ विशेष* छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दि. १५.८.२०२० ते २२.८.२०२० पर्यंत दररोज २२.०० वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे दुसर्या दिवशी ०८.१० वाजता पोहोचेल. *०११०६ विशेष* सावंतवाडी रोड येथून दि. १६.८.२०२० ते २३.८.२०२० पर्यंत दररोज ०८.५० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस त्याच दिवशी २०.०५ वाजता पोहोचेल. *थांबे* : दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.
*४. लोकमान्य टिळक टर्मिनस – रत्नागिरी – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (१६ फे-या)* *०११०७ विशेष* लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. १५.८.२०२० ते २२.८.२०२० पर्यंत दररोज २०.३० वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे दुसर्या दिवशी ०४.०० वाजता पोहोचेल. *०११०८ विशेष* रत्नागिरी येथून दि. १६.८.२०२० ते २३.८.२०२० पर्यंत दररोज ०६.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे १४.२० वाजता पोहोचेल. *थांबे* : ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.
*५. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- सावंतवाडी रोड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (२४ फे-या)* *०११०९ विशेष* छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दि. २५.८.२०२० ते ५.९.२०२० पर्यंत दररोज ०७.१० वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोडला त्याच दिवशी १९.१५ वाजता पोहोचेल. *०१११० विशेष* सावंतवाडी रोड येथून २५.८.२०२० ते ५.९.२०२० पर्यंत दररोज २०.३५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसर्या दिवशी ०६.४५ वाजता पोहोचेल. *थांबे* : दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.
*६. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – सावंतवाडी रोड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (२४ फे-या)* *०११११ विशेष* छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दि. २५.८.२०२० ते ५.९.२०२० पर्यंत दररोज ०५.५० वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोडला त्याच दिवशी १६.१५ वाजता पोहोचेल. *०१११२ विशेष* सावंतवाडी रोड येथून दि. २५.८.२०२० ते ५.९.२०२० पर्यंत दररोज १८.१५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दुसर्या दिवशी ०५.५० वाजता पोहोचेल. *थांबे* : दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.
*७. लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (२६ फे-या)* *०१११३ विशेष* लोकमान्य टिळक टर्मिनस दि. २४.८.२०२० ते ५.९.२०२० पर्यंत दररोज ०५.३० वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोडला त्याच दिवशी १५.५० वाजता पोहोचेल. *०१११४ विशेष* सावंतवाडी रोड येथून दि. २४.८.२०२० ते ५.९.२०२० पर्यंत दररोज १७.३० वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी ०६.१५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. *थांबे* : ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.
*८. लोकमान्य टिळक टर्मिनस – रत्नागिरी – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (२४ फे-या)* *०१११५ विशेष* लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. २५.८.२०२० ते ५.९.२०२० पर्यंत दररोज ११.५५ वाजता सुटेल आणि रत्नागिरीला त्याच दिवशी १९.०० वाजता पोहोचेल. *०१११६ विशेष* दररोज रत्नागिरी येथून दि. २५.८.२०२० ते ५.९.२०२० पर्यंत दररोज २०.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसर्या दिवशी ०४.१५ वाजता पोहोचेल. *थांबे* : ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.
या सर्व आरक्षित विशेष गाड्यांची *संरचनाः* १३ शयनयान (स्लीपर क्लास), ६ आरक्षित सामान्य द्वितीय श्रेणी , १ द्वितीय वातानुकूलित (एसी -२ टायर), ४ तृतीय वातानुकूलित (एसी-3 टायर ) डब्बे. आरक्षण* : या विशेष गाड्यांसाठी बुकिंग १५.८.२०२० पासून आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरू होईल.