गुहागर – गुहागर तालुक्यात एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका नराधमाने अल्पवयीन मुलीला समुद्रकिनारी नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणामुळे संपूर्ण गुहागर परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुहागरमधील प्रितेश सुर्वे राहणार धोपावे वय 29 या आरोपीने अल्पवयीन मुलीला फिरायला घेऊन जाण्याचे सांगितले. त्यानंतर त्या मुलीला समुद्रकिनाऱ्यावर नेऊन त्याने तिला दारू पाजली आणि तिच्यावर दिवसभर लैंगिक अत्याचार केला. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर रात्री जबरदस्तीने तिला एका लॉजवर नेऊन पुन्हा अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुलगी रात्रभर घरी न आल्याने तिच्या पालकांनी गुहागर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार केली. दुसऱ्या दिवशी मुलगी स्वतः घरी आली असता तिची अवस्था पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. अखेर चौकशीत मुलींनी सपूर्ण प्रकार सागितल्यावर गुहागर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी प्रितेश सुर्वे याला अटक केली. त्याच्यावर पोक्सो (POCSO) कायद्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई प्रभारी अधिकारी अमोल गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक संदीप भोपळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.या घटनेनंतर गुहागर आणि परिसरात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून नागरिकांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
















