गुहागर ; बांधकाम उपअभियंत्याला ७ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

0
543
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर पंचायत समितीमधील बांधकाम विभागाच्या एका उपअभियंत्याला लाच स्वीकारल्याबद्दल अँटी करप्शन ब्युरो (ACB) च्या रत्नागिरी युनिटने रंगेहाथ पकडले आहे.

संजय तुळशीराम सळमळे, उपअभियंता, जिल्हा परिषद, बांधकाम उपविभाग, गुहागर, जि. रत्नागिरी (वर्ग १) यांना ७,०००/- (सात हजार रुपये) रुपयांची लाच स्वीकारल्याबद्दल लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांनी ताब्यात घेतले आहे.
तक्रारदार हे एका बांधकाम ठेकेदाराकडे सुपरवायझर म्हणून काम करतात. त्यांचे बांधकाम देयकांचे काम होते. हे देयक पास करण्यासाठी लोकसेवक संजय सळमळे यांची स्वाक्षरी आवश्यक होती. तक्रारदार १६/१२/२०२५ रोजी संबंधित लोकसेवकाच्या कार्यालयात गेले असता, लोकसेवकाने त्यांच्याकडे देयकावर स्वाक्षरी करण्यासाठी आणि सोबत जोडलेल्या कामाचे फोटो सहीसाठी ७,०००/- रुपये लाच रकमेची मागणी केली. त्यानंतर उप अभियंता संजय सळमळे यांनी तक्रारदाराकडे आज दिनांक १६/१२/२०२५ रोजी ७,०००/- रुपयांची मागणी करून ती लगेच स्वीकारण्याचे मान्य केले.
या मागणीनुसार आज लोकसेवक सळमळे यांनी उप अभियंता यांच्या दालनामध्ये तक्रारदाराकडून ७,०००/- रुपये (सात हजार रुपये) स्वीकारल्यानंतर त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. गुहागर मध्ये घडलेल्या या प्रकाराने सध्या सर्वत्र खळबळ उडाली असून किती दिवसापासून सुरू होता याची चर्चा गुहागरच्या नाक्या नाक्यावर सुरू आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here