मार्गताम्हाणे – चिपळूण तालुक्यातील उमरोली येथील संतोष खातू यांची सुकन्या तन्वी खातू हि CA परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने तिचे सध्या सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.
उमरोली येथील संतोष खातू यांची सुकन्या तन्वी खातू हिचे संपूर्ण शिक्षण हे मार्गताम्हाणे येतील वसंतराव भागवत महाविद्यालयात झाले. अतिशय कठीण अशी CA परीक्षा देत ती उत्तीर्ण झाल्याने तिचे सध्या संपूर्ण पंचक्रोशीतून अभिनंदन आणि कौतुक करण्यात येते आहे. उमरोली गावातील पहिला CA. होण्याचा मान हा तन्वी
ला मिळाला आहे. संपूर्ण देशामध्ये फायनल सीए परीक्षेचा निकाल फक्त 5% लागतो.त्यामधून स्पर्धात्मक परीक्षेमध्ये एवढे उत्तुंग यश मिळवल्याबद्दल तिचे सध्या
अभिनंदन होत आहे.
















