आता दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायम धावणार

0
2
बातम्या शेअर करा

चिपळूण -कोकण रेल्वे मार्गावर दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. कोकण रेल्वेमार्गावर चिपळूण आणि रत्नागिरीसाठी स्वतंत्र रेल्वे सोडण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून सुरू होती.. रेल्वे प्रशासनाने १५ ऑगस्टपासून गणेशोत्सव काळात होणारी गर्दी लक्षात घेऊन मेमू रेल्वे सुरू केली होती आणि ती दिवाळीपर्यंत सुरू ठेवण्यात आली होती. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून मध्य रेल्वेने ही गाडी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.

दिवा ते चिपळूण मेमू लोकल सकाळी ७.१५ वाजता दिवा रेल्वेस्थानकातून चिपळूणसाठी धावेल, तर परतीची मेमू लोकल दुपारी १२ वाजता चिपळूण रेल्वेस्थानकातून दिव्यासाठी रवाना होईल. दोन्ही गाड्या सहा ते सात तासात निश्चित ठिकाणी पोहोचतील. त्यामुळे एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांवरील ताण कमी होणार आहे. रेल्वे प्रशासनाने दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय घेतल्याने २५ वर्षांनंतर चिपळूणसाठी स्वतंत्र गाडी मिळाल्यामुळे कोकणातील हजारो प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here