चिपळूण ; वहाळ जिल्हापरिषद गटात उबाठाला खिंडार, संदीप सावंत ठरले किंगमेकर

0
305
बातम्या शेअर करा

चिपळूण – चिपळूण तालुक्यातील वहाळ जिल्हापरिषद गटात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला जबरदस्त असे खिंडार पडले असून प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी थेट एकनाथ शिंदे व पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.वहाळ जिल्हापरिषद गटात आमदार भास्कर जाधव यांचे एकहाती वर्चस्व असताना प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेतलेली ही भूमिका उबाठाला मोठा धक्का देणारी ठरली आहे.या निमित्ताने संदीप सावंत यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.


चिपळूण तालुक्यातील सावर्डे नंतर वहाळ जिल्हापरिषद गट हा राजकीय प्रतिष्ठेचा मानला जातो.हा जिल्हापरिषद गट गुहागर विधानसभा मतदारसंघात येत असल्याने सहाजिकच या गटाला राजकीय महत्व प्राप्त झाले आहे.तसेच सावर्डे,कोकरे हे जिल्हापरिषद गट वहाळ गटाला जोडून आहेत,त्यामुळे आजूबाजूला त्याचे राजकीय पडसाद उमटत असतात.त्यामुळे वहाळ जिल्हापरिषद गट हा नेहमीच चर्चेत राहिला असून आमदार भास्कर जाधव यांचा हा गड समजला जातो.पण यावेळी संदीप सावंत यांनी त्या गटालाच पोखरले असल्याचे समोर आले आहे. त्यांनी उबाठाचे प्रमुख मोहरे टिपले असून वहाळ जिल्हापरिषद गटात आम.जाधव यांना जोरदार दणका दिला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे हे नुकतेच रत्नागिरी दौऱ्यावर आले होते,त्यावेळी वहाळ गटातील उबाठाचे कळंबट शाखाप्रमुख बाबुराव घाणेकर, मुर्तवडे शाखाप्रमुख अशोक पांचाळ, कळंबट-घवाळगाव शाखाप्रमुख संदीप निर्मळ, तोंडली शाखाप्रमुख दिलीप कांबळे, वीर शाखाप्रमुख अंकुश घेवडे, कळंबट उपशाखाप्रमुख महेश पिलवलकर, मुर्तवडे उपशाखाप्रमुख दीपक पांचाळ, कळंबट केंद्रप्रमुख महेश काटदरे, कळंबट बूथप्रमुख विश्वनाथ शिरकर, वीर बुथप्रमुख पांडुरंग दुर्गुले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी थेट शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब,पालकमंत्री उदय सामंत साहेब,राज्याचे गृहमंत्री योगेश कदम,माजी आमदार सुभाष बने ,माजी आमदार राजन साळवी ,उपनेते संजय कदम ,राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण तसेच संदीप सावंत यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांचे पक्षात स्वागत करून पक्षासाठी कामाला लागण्याचे सूचना दिले. या पक्षप्रवेशासाठी संदीप सावंत यांनी केलेल्या प्रयत्नांचे देखील नेत्यांनी तोंडभरून कौतुक केले.एका विद्यमान आमदारांच्या मतदारसंघातील पदाधिकारी आमदारांची साथ सोडून शिवसेना पक्षात प्रवेश करत आहेत,ही संदीप सावंत यांच्या कामाची पोचपावती असल्याचे यावेळी पालकमंत्री उदय सामंत म्हणाले. आता ज्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे,


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here