गुहागर ; लोकअदालत मध्ये 1835 प्रकरणे निकालीत

0
1
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर येथील दिवाणी न्यायालयात 13 सप्टेंबर रोजी राष्टीय लोकअदालत पार पडली. या दिवशी अनेक प्रकरणांमध्ये सामोपचाऱ्याने तडजोड करून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यात आला.

या राष्ट्रीय लोकअदालत मध्ये दिवाणी न्यायालय गुहागर येथे सुमारे 1833 प्रीलिटीगेशन प्रकरणासह एकूण 1835 प्रकरणे निकाली काढण्यात आली यामध्ये -1,525,039/- इतक्या रकमेची सेटलमेंट करण्यात आली यामध्ये पॅनल प्रमुख म्हणून
अध्यक्ष तालुका विधीसेवा समिती गुहागर तथा दिवाणी न्यायाधीश गुहागर पी.व्ही.कपाडीया होते. यावेळी या राष्ट्रीय लोक अदालतचा लाभ घ्यावा व आपसातील वाद सामोपचाराने मिटवण्याचा प्रयत्न या लोक अदालत मध्ये करण्यात आला. या दिवशी अनेक लोकांनी आपली उपस्थिती दाखवून या दिवशी लोक अदालसाठी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद दिला. यावेळी पॅनल विधीज्ञ म्हणून वकील अलंकार विखारे यांनी काम पाहिले. या लोकअदालतीमुळे केली अनेक वर्ष अडकून असलेल्या प्रकरणांमध्ये अनेकांना न्याय मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here