दहावीचा निकाल; यंदाही कोकण अव्वलच

0
256
बातम्या शेअर करा

पुणे – कोकण विभागीय मंडळाचा दहावीचा निकाल सलग नवव्या वर्षी राज्यात अव्वल ठरला. मंडळाचा निकाल 98.77 टक्के लागला. आतापर्यंतचा हा सर्वाधिक निकाल ठरला असून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल 98.93 टक्के आणि रत्नागिरी जिल्ह्याचा 98.69 टक्के लागला.

गतवर्षी कोकण मंडळाचा निकाल 88.38 टक्के व यंदाचा निकाल 98.77 टक्के म्हणजे तब्बल 10.39 टक्के निकालात वाढ झाली आहे. दहावीचा निकाल आज दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर झाला. 2012 पासून कोकण विभागीय मंडळ अस्तित्त्वात आले आणि त्या वर्षीपासूनच सलग या मंडळाचा निकाल अव्वल लागला आहे. यंदा कोरोनामुळे दहावीचा भूगोलाचा पेपर होऊ शकला नव्हता.

रत्नागिरी जिल्ह्यातून 22547 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली व 22506 विद्यार्थी परीक्षेला बसले. यातील 22211 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 11185 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. पैकी 11180 विद्यार्थी परीक्षेला बसले आणि 11060 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कोकण मंडळात एकूण 33686 पैकी 33271 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण 98.39 टक्के व मुलींचे 99.16 टक्के म्हणजे मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 0.77 टक्के अधिक आहे. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची टक्केवारी चांगली आहे. रत्नागिरीतून 1353 विद्यार्थ्यांपैकी 1059 विद्यार्थी (78.27 टक्के) उत्तीर्ण झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 460 विद्यार्थ्यांपैकी 355 उत्तीर्ण (77.17 टक्के) झाले.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here