महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकारांना २०हजार सन्मान निधी मिळणार.. माईच्या शीतल करदेकर यांनी मानले शासनाचे आभार

0
12
बातम्या शेअर करा

मुंबई – आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकारांना यापूर्वीच जाहीर करण्यात आलेले मासिक २० हजार अर्थसहाय्य मिळण्याचा मार्ग सुकर केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना राज्यातील पत्रकारांच्यावतीने मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या संस्थापक अध्यक्ष शीतल हरीष करदेकर यांनी धन्यवाद दिले आहेत.

आर्थिक अडचण दूर करण्यासाठी शासनाने ‘शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी’च्या ठेवीच्या रक्कमेत ५०
कोटींची वाढ करुन या निधीची एकूण ठेवीची रक्कम आता ₹ १०० कोटी केली आहे. मुदत ठेव स्वरुपात गुंतवण्यात आलेल्या निधीच्या व्याजातून आता ज्येष्ठ पत्रकारांना मासिक २० हजार आर्थिक सहाय्य मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
या दोन्ही निर्णयाबाबतचे स्वतंत्र शासन निर्णय काल शासनाकडून निर्गमीत करण्यात आले आहेत”, असेही शीतल करदेकर यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. दरम्यान, “सदर ज्येष्ठ पत्रकार सन्माननिधीतील ही रु. ९ हजार ची वाढ देताना ती याबाबतचा शासन निर्णय झाल्यापासून म्हणजेच दि. १४ मार्च २०२४ पासूनच्या
फरकासह येत्या दि. ०१ एप्रिल २०२५ पासून देण्यात यावी, अशी मागणी आम्ही यापूर्वीच शासनाकडे केली आहे. या मागणीचा
शासनाने सकारात्मक विचार करावा”, असेही आवाहन शीतल करदेकर यांनी पत्रकाद्वारे केले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here