किनगाव ; बसस्थानकात १५ वर्षापासून शौचालय व पाणीच नाही ! याची प्रशासनाला लाज का वाटत नाही ?

0
52
बातम्या शेअर करा

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील बसस्थानकातून दररोज १५० बसेस ये- जा करतात. तर ७ बसेस मुक्कामी राहतात. मागील १५ वर्षापासून या बसस्थानकात महिला व पूरुषासाठी शौचालय आणि पिण्याचे व सांडपाण्याचा एक थेंब सुद्धा नाही . मुक्कामी असणाऱ्या चालक – वाहक साठी निवासस्थान, पिण्याचे पाणी व शौचालयाची सोयच नाही. या बसस्थानकात मागील १५ वर्षापासून  मुलभूत  सुविधा नसल्याची प्रशासनाला लाज का वाटत नसावी? असा संतप्त सवाल महिला प्रवाशी करत आहेत .


किनगाव हे लातूर, परभणी व बीड या जिल्ह्याच्या सीमेवरील तालुक्याच्या दर्जाचे गाव या बस स्थानकातून छत्रपती संभाजी नगर , जिंतूर, गंगाखेड , नांदेड , अहमदपूर, उदगीर, बिदर ,लातूर, औसा , परळी, अंबाजोगाई आगाराच्या दैनंदिन १५० बसेस ये -जा करतात. दररोज ७ बसेस मुक्कामी आसतात. हे बसस्थानक मुलभूत गरजेपासुन कोसो दुर असत्यामुळे प्रवाशांची व एसटी कर्मचारी यांची मात्र मोठया प्रमणात गैरसोय होत आहे . सद्या लाखो रुपये खर्च करुन गुत्तेदारामार्फत बसस्थानक सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. परंतू बसस्थानकातील शौचालय ,पिण्याचे पाणी व सांडपाणी,तसेच, चालक व वाहक यांचे निवासस्थानाचा कसलाचा सामावेश नसल्याने हे प्रशासनाचे कसले सुशोभीकरण आहे? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेस पडला आहे. बसस्थानक सुशोभीकरण अंतर्गत बससस्थानकाचे सुशोभीकरण अंतर्गत २८०० स्क्वेअर मीटर जागेत सिमेंट काँक्रीटचे काम सुरू आहे.
बसस्थानकात पाण्याची टाकी २५ वर्षांपूर्वी बांधलेली आहे . मागील पंधरा वर्षापासून या टाकीत पाण्याचा एक थेंबही नाही. बसस्थानकाला पाणीपुरवठा योजनेचे कनेक्शनच नाही. शौचालयाची परिस्थिती अतिशय वाईट असून पूर्वी बांधलेले शौचालय व मुतारी पूर्णपणे पडली आहे. महिलांना व पुरुषांना झाडाझुडपाचा आडूसा धरून लघुशंकेसाठी जावे लागत आहे . पाण्याची कसली सुविधा नसल्याने त्या मुताऱ्यांमधून अतिशय दुर्गंधी सुटल्यामुळे त्या मुताऱ्याकडे सुद्धा कोणीच फिरकत नाही . शौचालय व मुतारीची अतिशय वाईट अवस्था आहे . या बसस्थानकात दररोज सात बसेस या ठिकाणी मुक्कामी असतात. चालक व वाहक यांना झोपण्यासाठी कसली व्यवस्था नसून सकाळी उठल्यानंतर शौचालय व आंघोळीसाठी सुध्दा कसलीच व्यवस्था नसल्याने चालकास जिथून पाणी मिळेल तेथून घागर व कँटमध्ये पाणी आणून शौचालयास उघडयावर जावून त्या पाण्याने तोंड धुवून उघड्यावर स्नान करावे लागत आहे.
वरिष्ठांनी या बसस्थानकाची प्रत्यक्ष पाहणी करुन नविन शौचालय, पाण्याची व्यवस्था , चालक – वाहक यांना निवास्थान निर्माण करण्याची मागणी त्रस्त प्रवाशी व चालक – वाहक यांच्यातुन होत आहे .


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here