अहमदपूर: (प्रतिनिधी ) – अहमदपूर तालुक्यातील मौजे धानोरा खुर्द येथील गरोदर मातेचा प्रस्तुती पूर्व दुर्दैवरित्या मत्यू, त्यामुळे संतापलेल्या नातेवाईक व गावकऱ्यांनी येथील डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली आहे.
अहमदपूर तालुक्यातील धानोरा खुर्द गावातील 23 वर्षीय दिपाली दयानंद वाघमारे ही 15 डिसेंबर रोजी दुपारी साधारणता दोनच्या सुमारास ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथे पहिल्या बाळंतपणासाठी दाखल झाली होती. प्रस्तुती पूर्वी तेथील उपस्थित तज्ञ डॉक्टरांनी तिची वैद्यकिय तपासणी करून नैसर्गिक बाळंतीण होईल असे सांगितले, दुपारपासून रात्रीपर्यंत नातेवाईकांनी डॉक्टरांच्या शब्दावर विश्वास ठेवून बाळंतीण होण्याची वाट पाहिली आणि रात्री पुन्हा एकदा दिपालीच्या आईने डॉक्टरांना विचारले की “साहेब माझी मुलगी अजून बाळंतीण झाली नाही सर्व काही बरोबर आहे का? कधी बाळांतीन होणार?” त्यावर तेथील डॉक्टरांनी आईला पुन्हा तेच उत्तर दिले “होईल बाळांतीण पण थोडा वेळ लागेल.” असे करता करता रात्र निघून गेली दुसरा दिवस उजाडला दिपालीच्या आईला मुलीची काळजी वाटू लागली सकाळी डॉक्टर आले दिपालीचे चेकअप केले आणि सांगितले की “साधारण बाळंतीण होणार नाही, सिजरिंग करावे लागेल” म्हणून संमती पत्रावर सह्या घेतल्या आणि सिजरिंग साठी ऑपरेशन थेटर मध्ये घेऊन गेले आणि थोड्याच वेळात पुन्हा बाहेर आले आणि सांगितले इथे डिलिव्हरी होणार नाही पुढे लातूरला शासकीय रुग्णालयात जावे लागेल लगेच घेऊन जा आम्ही गाडी बोलावली आहे दिपालीच्या आईने डॉक्टरांना विनंती केली “साहेब माझी मुलगी कालपासून येथे दाखल आहे इथेच प्रयत्न करा माझ्यासोबत कोणीही पुरुष नाही आम्ही गरीब कुटुंबातील आहोत आमची लातूर ला खूप गैरसोय होईल” मात्र डॉक्टरांनी दिपालीस शासकीय रुग्णवाहिकेने (१०८) सकाळी साधारणतः अकरा वाजता लातूरकडे रवाना केले लातूरकडे जात असताना चापोली ते चाकूरच्या दरम्यान दिपाली वाघमारे चा मृत्यू झाला असे आईने सांगीतले, तसेच ॲम्बुलन्स लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैदकीय महाविद्यालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले व शवविच्छेनानंतर दिपालीचे प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले आज 17 डिसेंबर रोजी शोकाकुल वातावरणात धानोरा येथील गावकऱ्यांनी दिपालीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. नातेवाईकांना या सर्व प्रकरणात डॉक्टरांच्या निष्काळजी पुन्हा मुळे दिपालीचा मृत्यू झाल्याचा संशय असून अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या दोषी डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे आज गावातील शेकडो गावकरी व नातेवाईक यांनी ग्रामीण रुग्णालयात ठिय्या मांडला तसेच पोलीस स्टेशन अहमदपूर येथे कारवाई करण्यासाठी पोलीस निरीक्षक यांच्याकडे रीतसर लेखी तक्रार केली आहे.
ग्रामीण रुग्णालय अहमदपूर च्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता येथील सम्राट मित्र मंडळ सामाजिक संघटनेने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पीडित कुटुंबास धीर देत या संपूर्ण प्रकरणाची रीतसर चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यासाठी प्रयत्न केले. सबंधित वरिष्ठ अधिकारी व लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांना फोन द्वारे संघटनेचे अध्यक्ष डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला व या प्रकरणात जे जे दोषी आढळतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी विनंती केली. त्यांच्या या विनंतीवरून आज लातूर येथील चौकशी समिती अहमदपूर ग्रामीण रुग्णालयात तात्काळ दाखल झाली व सदरील प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन चौकशी समितीने दिले.















