गुहागर – गुहागर येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले पण मूळचे मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील असलेले ज्ञानेश्वर काळूराम चव्हाण हे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह मूळ गावी हिंगोली येथे गणपतीसाठी गावी जाण्यासाठी मंगळवारी निघाले असताना अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
गणपती सणासाठी सुट्ट्या जाहीर झाल्यावर मंगळवारी (२६ ऑगस्ट) सायंकाळी ५ वाजता हे कुटुंब आपल्या गावी जाण्यासाठी निघाले. त्यातच काल चिपळूण परिसरात असताना त्यांचा शेवटचा संपर्क झाला होता. गेल्या वीस वर्षापासून कोकणातील गुहागर तालुक्यात जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत.
गणेशोत्सवासाठी आपल्या कुटुंबासह गावी जाण्यासाठी चव्हाण हे गुहागर वरून प्रवास सुरू केला होता. काल सायंकाळी ५ च्या सुमारास ते चिपळूणला पोहोचले होते. त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला असून, अद्यापही त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांचे कुटुंबिय त्यांना शोधण्यासाठी हिंगोलीहून निघाले असून, त्यांनी मित्र आणि नातेवाईकांकडे चौकशी सुरू केली आहे. चव्हाण कुटुंब ज्या गाडीने प्रवास करत होते, ती गाडी किंवा त्यांना कोणी पाहिले असल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे कळकळीचे आवाहन चव्हाण यांच्या कुटुंबियांनी केले आहे. या कठीण प्रसंगात मदत करण्यासाठी भारत देवकांत पाटण (संपर्क: ९८५०२७७९४२) आणि अभिजित गोळे सर (संपर्कः ८९७५७३२०९४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे