कराड ; 29 नोव्हेंबर पासून महापारेषण कराड आंतर-मंडलीय नाट्य स्पर्धा

0
304
बातम्या शेअर करा

कराड – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामधील महापारेषण आयोजित अउदा प्रकल्प नि संवसु परिमंडल कराड आंतर-मंडलीय नाट्य स्पर्धा २०२४ यावर्षी सातारा जिल्ह्यातील कराड येथे होणार आहे. त्याचे उद्घाटन 29 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता होणार आहे.

महापारेषण मधील सर्वच कर्मचारी हे वर्षाचे 365 दिवस वीज पुरवठा सुरळीत राहावा यासाठी नियमित काम करत असतात. कोरोना मध्ये सुद्धा आपल्या जीवाची परवा न करता या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन काम केले. याच कर्मचाऱ्यांमधील अनेक कलागुणांना वाव मिळावी यासाठी दरवर्षी महापारेषण विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असते. त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून यावर्षी नाट्य स्पर्धा कराड येथे आयोजित करण्यात आली आहे. या नाट्य स्पर्धेसाठी सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातून महापारेषणचे कर्मचारी आणि अधिकारी सहभागी होणार आहेत.

कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मूर्तीसदन (टाऊन हॉल) येथे दोन दिवस या नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महापारेषण यांच्या शुभहस्ते होणार असून प्रमुख उपस्थिती म्हणून तर प्रमुख उपस्थिती म्हणून सुगत गमरे संचालक सतिश चव्हाण संचालक , तृप्ती मुधोळकर संचालक ,मंगेश शिंदे , अविनाश निंबाळकर संचालक ,भरत पाटील मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तर या कार्यक्रमाचे आयोजन शिल्पा कुंभार मुख्य अभियंता, कराड परिमंडल यांच्यासमवेत चिदाप्पा कोळी अधीक्षक अभियंता कराड, प्रांजल कांबळे अधीक्षक अभियंता कोल्हापूर ,श्रीकृष्ण नवलाखे ,अशोक सागरे, राजेश केळवकर, संजय किंकर ,प्रशांत चौधरी,राजू कोळी यांच्यासह नाट्य स्पर्धा आयोजन समिती करणार आहे.

दोन दिवस या ठिकाणी पाच जिल्ह्यातून आलेले महापारेषणचे कर्मचारी व अधिकारी आपली विविध कला नाटकाच्या माध्यमातून सादर करणार आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here