गुहागर – राज्यभरात नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकीत अनेक मातंबरांना पराभव ही पत्करावा लागला त्यातच अनेक पक्षातील अनेक उमेदवारांचे अनेक ठिकाणी डिपॉझिट जप्त झाल आहे. त्यातच गुहागर विधानसभा मतदारसंघात तब्बल पाच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. त्यामुळे खरी लढत ही फक्त दोनच उमेदवारांमध्ये झाल्याचे समोर आलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले.
गुहागर विधानसभेत विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेश बेंडल यांचा पराभव करत निसटता विजय संपादन केला मात्र असं असलं तरी या दोन्ही उमेदवारांच्या लढाईत इतर उमेदवारांचें मात्र डिपॉझिट जप्त झाल आहे.
विधानसभा निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणुक लढविण्याकरीता वैध नामनिर्देशनपत्रासोबत लोकप्रतिनिधीत्त्व अधिनियम 1951 चे कलम 34 अन्वये अनामत रकमेचा भरणा करावा लागतो. विधानसभा निवडणुकीत नोंदविण्यात आलेल्या एकुण वैध मतांच्या (नोटा वगळून) म्हणजे एकुण 1,50,290 यांच्या 1/6 म्हणजे 25,048 एवढी मते प्राप्त न झाल्याने पाच उमेदवारांनी भरणा केलेली अनामत रक्कम लोकप्रतिनिधीत्त्व अधिनियम 1951 च्या 158 नुसार मुख्य लेखाशिर्ष 0070 इतर प्रशासकीय सेवा 02-निवडणुक 104- शुल्क, दंड व जप्ती या लेखाशिर्षात चलानद्वारे शासनजमा करण्यात आली.या मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमोद गांधी अपक्ष उमेदवार सुनिल जाधव,प्रमोद आंब्रे,मोहन पवार ,संदीप फडकले या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करण्यात आले आहे.