कराड – महापारेषण कराड परिमंडळ आयोजित आंतर मंडलीय नाट्य स्पर्धा या नाट्य स्पर्धेचे उद्घाटन महापारेषण कंपनीचे मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भरत पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी विद्युत क्षेत्रात काम करताना अतिशय जोखमीचे काम करावे लागते या जोखमीच्या कामात आपली कला आपली आवड जपून ठेवावी तसेच कामाच्या वातावरणामध्ये नवचैतन्य निर्माण व्हावे या उद्देशाने आपण या नाट्य स्पर्धा आयोजित करत असतो. त्यामुळे या नाट्य स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडा तसेच या नाटकातून पुढे जाणाऱ्या नाटकाला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनात आज पासून होणाऱ्या नाट्य स्पर्धेसाठी महापारेषणचे पाच जिल्ह्यातील कलावंत आज कराड मध्ये दाखल झाले. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून त्या कार्यक्रमाचे सुरुवात करण्यात आली यावेळी महापारेषण कंपनीचे मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भरत पाटील यांचे पुष्पगुच्छ शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले. तसेच कराड परिमंडलच्या मुख्य अभियंता शिल्पा कुंभार यांचे सुद्धा पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.
कराड परिमंडळ आयोजित आंतर मंडलीय नाट्य स्पर्धा आज पासून पुढील फोन दिवस पार पडणार आहेत.

महापारेषण मधील हे कर्मचारी वर्षाचे 365 दिवस वीज पुरवठा सुरळीत राहावा यासाठी नियमित काम करत असतात. याच कर्मचाऱ्यांमधील अनेक कलागुणांना वाव मिळावा यासाठी दरवर्षी महापारेषण विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असते. त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून यावर्षी कराड आंतर मंडलीय नाट्य स्पर्धा, कराड येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. या नाट्य स्पर्धेसाठी सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील महापारेषणचे कर्मचारी आणि अधिकारी सहभागी झाले आहेत.
उद्घाटन प्रसंगी शिल्पा कुंभार, मुख्य अभियंता कराड परिमंडल, चिदाप्पा कोळी, अधीक्षक अभियंता, प्रांजल कांबळे, अधीक्षक अभियंता, श्रीकृष्ण नवलाखे अधीक्षक अभियंता,अशोक सागरे अधीक्षक अभियंता,
संजय किंकर अधीक्षक अभियंता, राजेश केळवकर, सहा. महाव्यवस्थापक (विवले) प्रशांत चौधरी सहा. महाव्यवस्थापक (मासं) यांच्यासह अनेक महापारेषणचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

पुढील दोन दिवस या नाट्य स्पर्धा सुरू राहणार आहेत.
सकाळी कोल्हापूर प्रकल्प व स्थापत्य मंडळाचे
पागला घोडा तर दुपारी कराड मंडळाचे अबुटभर ही दोन नाटके मोठ्या रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडली तर शनिवारी (ता. 30 ) सकाळी दहा ते दुपारी एकपर्यंत कोल्हापूर मंडळाचे
नेटवर्क 24*7 ही नाटके होतील.शनिवारी सायंकाळी पाच वाजता स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. त्यास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नाट्य सचिव चिदाप्पा कोळी यांनी केले आहे.