गुहागर – गुहागर तालुका भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा अध्यक्षपदी वेळंब गावच्या अपुर्वा बारगोडे यांची एकमताने माजी आमदार आणि गुहागर विधानसभा निवडणूक प्रमुख डॉ.विनय नातू यांनी नियुक्ती घोषित केली आहे. तर नुकत्याच झालेल्या तालुका कार्यकारणीमध्ये जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी अपुर्वा बारगोडे यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.
अपूर्वा बारगोडे यांच माहेर हे गुहागर तालुक्यातील खोडदे तर सासर हे वेळंब नालेवाडीत. मात्र व्यवसायाच्या निमित्ताने त्या गुजरात मध्ये होत्या. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावरती भारतीय जनता पार्टीच्या विचारांचा विशेष पगडा आहे.तर त्यांचे पती कै. अनंत बारगोडे यांची भारतीय जनता पार्टीच्या कामकाजाकरता वाहून घेण्याची असणारी ईच्छा अपुर्वा आज पुर्ण करत आहेत, त्यांची मुलगी डॉक्टर तर मुलगा नोकरीच्या निमित्ताने परदेशात असतो.तर शिक्षण हे एलएलबी पर्यंत पुर्ण झालेल आहे. कौटुंबिक आघाडीवर सर्व समाधानाने असताना भारतीय जनता पार्टीच्या कामकाजामध्ये वाहून घेण्याची तीव्र इच्छा असल्याने डॉ. विनय नातू यांनी त्यांच्याकडे गुहागर तालुका महिला मोर्चाची जबाबदारी दिली आहे. त्यांनी दिलेली जबाबदारी सर्वांना बरोबर घेऊन शत् प्रतिशत भाजपा करण्याच्या दृष्टीने पार पडणार असल्याचे यावेळी अपुर्वा बारगोडे यांनी सांगितले. त्यांच्या या निवडीचे गुहागर तालुक्यात सर्व स्तरातून कौतुकच होत असून या निवडीबद्दल महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सुरेखा खेराडे, प्रदेश उपाध्यक्ष चित्रा चव्हाण,प्रदेश कार्यकारिणी सदस्य निलम गोंधळी, माजी जि.प. सभापती स्मिता धामणस्कर,जिल्हा उपाध्यक्ष नम्रता निमुणकर, माजी सभापती दीप्ती अजगोलकर, माजी पंचायत समिती सदस्य धनश्री मांजरेकर, माजी तालुका अध्यक्ष श्रद्धा घाडे, वैशाली मावळणकर,ज्योती परचुरे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.