मुंबई – राज्यातील संघटीत आणि असंघटीत पत्रकार व माध्यमकर्मींच्या हक्कांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून कल्याणकारी मंडळ (वेल्फेअर बोर्ड) स्थापन करावे, अशी मागणी इंडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार शीतल करदेकर यांनी केली आहे.पत्रकारांच्या न्याय्य मागण्यासाठी शीतल करदेकर मुंबईत येत्या १० जुलैला आमरण उपोषण करणार आहेत. तसे प्रत्र त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहीले आहे.
भाऊस अनावृत्त पत्र
भाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब
आपली भेट होणं कठीण काम! आपण समाजकार्य, सिनेमा व प्रमोशन मधे व्यस्त!
आपली लाडकी बहिण शीतल करदेकर आमरण उपोषणाला बसणार!
आग्रह हाच की आपल्या चौथ्या स्तंभासाठी कल्याणकारी मंडळ (वेल्फेअर बोर्ड) करा! पत्रकारांना सन्मान द्या आर्थिक मानसिक समाजिक दृष्ट्या सक्षम करा!
जगज्जेत्या टीमवर कोटीच्या कोटी ची उधळण करताय,पाण्यात वाहून गेले, होर्डिग्ज पडून जीव गेले तर लाखो त मदत करताय!
श्रमिक पत्रकार रोज झिजतोय,तणावात जगतोय!कुणी राजकारण्याची हाजी हाजी करतोय ,तर कुणी काम टिकवण्यास धडपडतोय! वास्तव भयंकर आहे!
आपणास निवेदने देण्यात आली की त्याचं लोणचे होतं किंवा कचरा होतो यापलीकडे काहीच होत नाही!
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटून विषयही समजून घेतला नाही! आपण किमान समजुन घेण्याची तयारी दाखवता!
आपले सल्लागार किती संवेदनशील आहेत ते लवकरच कळेल!
पण एक आहे की मी माझ्या एकटीसाठी नाही मागत काही ; लोकशाहीच्या हितासाठी मागतेय!
पत्रकार हितासाठी वेल्फेअर बोर्ड तातडीने गठीत करा!
आपल्या व अर्थ मंत्री अजित दादा पवार यांच्या ठोस निर्णयाची वाट पहातेय! आधीच माझी तब्येत ठीक नसते,पण या कामासाठी माझा जीवही पणाला लावीन!
भाऊ,
आपली लाडकी बहिण वाट पहातेय!
१०जुलैला आमरण उपोषणास बसणार! मुंबईत !
शीतल करदेकर
संस्थापक अध्यक्ष
मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया