गुहागर – गुहागर तालुक्यात गेली दोन दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली असून रस्ता अजून पुरेसा धुपलेला नाही. त्यातच आज गुहागर – – विजापूर मार्गांवर शृंगारतळी जवळील हॉटेल झायका समोर दुचाकी घसरून दोन तरुण गंभीरित्या जखमी झाले आहेत. एकाची परिस्थिती गंभीर असून त्याला पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथे सिव्हील हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.
गुहागर वरून चिपळूण तालुक्यातील ओमळी येथील दोन तरूण अभिषेक बांद्रे व प्रसाद बांद्रे प्रवास करत होते. त्यावेळी हा अपघात झाला अपघात झाल्यानंतर तात्काळ त्यांना शृंगारतळी येथील ओक ह्यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. एकाच्या डोक्याला जबरदस्त मार लागल्यामुळे त्याला रत्नागिरी सिव्हल येते पाठविण्यात आल्याची माहिती डॉक्टरांकडून मिळाली आहे. अपघाताची माहिती मिळताच तरुणांचे नातेवाईक ही शृंगारतळी मध्ये दाखल झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच गुहागर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत.