चिपळुण – सण उत्सव असले की पोलीसांना बंदोबस्त असतो त्यामुळे पोलीस दलात काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांना आपल्या धार्मिक उत्सवांमध्ये सहभागी होण्याची संधी क्वचितच मिळते. बरेचदा आपण पाहिले असेेल पोलीस ठाण्यात गणेशोत्सव, ईद, दिवाळी साजरी केली जाते पण चिपळुण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रविंद्र शिंदे यांनी पोलीस स्थानकात पहिल्यांदाच बुद्धजयंंती साजरी केल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
हिंदु – मुस्लीम धर्मिय सण पोलीस दलात उत्साहात साजरे केले जातात परंतु पोलीस दलात बौद्ध अधिकारी व अंमलदार मोठ्या प्रमाणात पोलीस दलात सर्वधर्म समभाव रहावा व आपलेपणाची भावना असावी म्हणुन अशा प्रकारे इतर धर्मियांच्या सणांसह बुद्धजयंती साजरी केल्याचे दिसुन येते.
चिपळुणातील ‘ डाऊन टू अर्थ ’ अधिकारी म्हणुन ओळख,वरिष्ठांचे पाठबळ
पोलीस निरिक्षक रविंद्र शिंदे यांनी चिपळुण पोलीस स्थानकाचा चार्ज घेतलेपासुन ‘ पब्लिक आणि पोलीस ’ यांच्यातील दरी कमी झाली आहे. सर्वसामान्य लोकांना केव्हाही भेट देणारा अधिकारी व सामान्य लोकांमध्ये रमणारा अधिकारी म्हणुन त्यांनी आपली ओळख निर्माण केली असुन चिपळुण शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यात ते यशस्वी झाले आहेत. विविध राजकीय,सामाजिक, प्रसासकीय व शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यानी आपलेविषयी आदर निर्माण केला आहे. आपल्या यशामागे ‘श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद’ व जिल्ह्यातील वरिष्ठ अधिका-यांचे पाठबळ व मार्गदर्शन असल्याचे ते नेहमी सांगतात.
बुद्धजयंती साजरी करतेवेळी पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरिक्षक विकास निकम, श्रीमती वेंगुर्लेकर, पोलीस हवालदार पाटील, सुकन्या आंबेरकर, प्रविण जाधव व इतर स्टाफ उपस्थित होते