कोकण रेल्वे मार्गावर आता दर रविवारी धावणार चिपळूण पनवेल मेमू रेल्वे

0
1151
बातम्या शेअर करा

चिपळूण – कोकणातील चाकरमान्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी कोकण आणि मध्य रेल्वेच्या सहयोगाने ०११५८ चिपळूण -पनवेल / ०११५७ पनवेल – रत्नागिरी अशी संपूर्ण अनारक्षित असणारी ८ डब्यांची मेमू स्पेशल साप्ताहिक ट्रेन चालवली जाणार आहे. ही गाडी दि. ४ फेब्रुवारी २०२४ पासून फक्त रविवारी धावणार आहे.

कोकण रेल्वे दिलेल्या माहितीनुसार मेमू स्पेशल ट्रेन ४ फेब्रुवारी ते ३१ मार्च, २०२४ पर्यंत केवळ दर रविवारी ०११५७ चिपळूण येथून दुपारी ३:२५ ला सुटून पनवेल येथे रात्री ८:१५ ला पोहोचेल आणि ०११५७ पनवेल येथून रात्री ८:२५ ला सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.

०११५७ पनवेल-रत्नागिरी मेमूचे थांबे

सोमटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड, अंजनी, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.

०११५८ चिपळूण- पनवेल मेमूचे थांबे

अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, निडी, नागोठणे, कासू, पेण, हमरापूर, जिते, आपटा, रसायनी आणि सोमटणे


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here