उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर चिपळूण मध्ये 5 रोजी होणार सभा

0
153
बातम्या शेअर करा


चिपळूण – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस कोकण दौऱ्यावर येत असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. या दौऱ्यात ठाकरे काय बोलणार याबाबत शिवसैनिकांसह महाविकास आघाडीलाही उत्सुकता लागून राहीली आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने शिवसैनिकांमध्ये नवी ऊर्जा निर्माण झाली असून चिपळुणातील जाहीर सभेची देखील जोरदार तयारी सुरू केली आहे.


माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ४ आणि ५ फेब्रुवारी रोजी कोकण दौऱ्यावर येत आहेत. या दोन दिवसाच्या दौऱ्यात ते रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यात विधानसभा मतदार संघ निहाय जाहीरसभा घेत पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमवेत संवाद बैठका घेणार आहेत. पहिल्या टप्प्यात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, रत्नागिरी व चिपळुण मतदार संघात ते ५ रोजी सभाा घेणार आहेत. तत्पुर्वी ते ४ फेब्रुवारी रोजी सावंतवाडी, कुडाळ, मालवण, आंगणेवाडी भराडी देवी दर्शन, कणकवली असा दौरा करणार आहेत. त्यानंतर ५ फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरे हे बारसू, राजापूर, रत्नागिरी, देवरुख, चिपळूण या ठिकाणचा दौरा करणार आहेत. शिवसेनेत उभी फूट पडली त्याचे पडसाद कोकणात देखील उमटले. कोकणातील तीन आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे कोकणात देखील उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला. त्यानंतर आता प्रथमच उद्धव ठाकरे कोकणाच्या दौऱ्यावर येत असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघात त्यांचे संवाद बैठका होणार असून त्याची जय्यत अशी तयारी शिवसैनिक करत आहेत. दस्तरखुद्द पक्षप्रमुख येत असल्याने शिवसैनिकामध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे.
आतापासूनच लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी वरून इच्छुकांमध्ये मोठी चढाओढ सुरू आहे. काही महिन्यांपुर्वी उद्योजक किरण सामंत यांनी मशाल चिन्हाचा स्टेटस ठेवून खळबळ उडवून दिली होती. तेव्हापासून लोकसभेच्या निवडणूकीसाठी त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याशिवाय लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार, यावरूनही खलबते सुरू आहेत. त्यामुळे याबाबत उद्धव ठाकरे काय बोलतात याकडेही सर्वांचे लक्ष वेधले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर देखील महाविकास आघाडी मार्फत इच्छुक उमेदवारांची प्रत्येक मतदार संघात चढाओढ सुरु झाली आहे. या दौऱ्याच्या निमीत्ताने त्याचाही कानोसा घेतला जात आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here