दापोली- दापोली उपजिल्हा रुग्णालयात कोरोना सेंटर त्वरित सुरू करावे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांना देण्यात आला आहे.
दापोली-मंडणगड-खेड मध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला असुन सध्या दापोली मध्ये १०८ रूग्णवाहीकेची कमतरता आहे. रुग्णांना जिल्हा केवीड सेंटर मध्ये दाखल करण्यास खुप विलंब होत आहे. दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात २० कॉटचे आय.सी.यु.उपलब्ध आहे. तालुक्यातील अत्यायवस्थ रूग्णांना रत्नागिरी येथे न हलवता जवळच दापोली उपजिल्हा रुग्णालयांमध्ये तात्काळ कोविड १९ रुग्णांवर उपचार होतील. त्यामुळे दापोली तालुक्यातील वाढलेला मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल. त्वरीत दापोली येथे कोवीड १९ सेंटर चालु करण्यास शासकीय स्तरावर तात्काळ परवानगी द्यावी. अन्यथा नाईलाजास्तव लोकप्रतिनिधीनां आंदोलनाचा पवित्रा अवलंबावा लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस कडून देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांना देण्यात आला आहे.
या वेळी माजी आमदार संजय कदम यांच्या समवेत माजी सभापती व विद्यमान पंचायत समिती सदस्य राजेश गुजर, उप सभापती ममता शिंदे, पंचायत समिती सदस्य दिपक खळे, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत बैकर, जिल्हापरिषद सदस्य मोहन मुळे, जिल्हा परिषदसदस्या नेहा जाधव, गटविकास अधिकारी राऊत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते रविंद्र कालेकर, युवक जिल्हाध्यक्ष चेतन दळवी, केदार पतंगे, दापोली तालुका युवक अध्यक्ष विजय मुंगशे, धिरज पटेल, युवराज जाधव, पप्या जोशी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.