शिर्डी ; १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत कल्याण येथील संतोष स्पोर्ट्सने पटकावले विजेतेपद

0
279
बातम्या शेअर करा

शिर्डी – आत्मा मालिक स्पोर्ट्स क्रिकेट अकादमी आयोजित १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत कल्याणच्या संतोष स्पोर्टस क्रिकेट अकादमी संघाने शानदार कामगिरी नोंदवत विजेतेपद पटकावले. वंश मोहितेची नाबाद ६८ धावांची खेळी निर्णायक ठरली.

कोपरगाव-शिडीं क्रीडा महोत्सवाचे शिर्डी येथे भव्य आयोजन करण्यात आले होते. क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कल्याणच्या संतोष स्पोर्टस
क्रिकेट अकादमी संघाने पुण्याच्या रोहन क्रिकेट क्लब संघाचा पराभव करुन अजिंक्यपद संपादन केले. संतोष स्पोर्टस क्रिकेट अकादमीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात आठ बाद ११३ धावसंख्या उभारली. धावांचा पाठलाग करताना रोहन क्रिकेट क्लब अवघ्या ७९ धार्थात गडगडला. या सामन्यात संतोष स्पोर्टस क्रिकेट अकादमीच्या बारा वर्षीय वंश मोहिते याने नाबाद ६८ धावांची आक्रमक खेळी करुन संघाच्या विजेतेपदात मोलाचा वाटा उचलला, या सामन्यात कविश चौधरी (३२), मित चंद (२५), वेदांत गिरी (१८), साहिल पवार (२ बळी), वेदांत गिरी (२ बळी), सोहम मोठे (२ बळी), कनिष्क शेलार (२ बळी), रजत डोहाळे (२ बळी) यांनी सुरेख कामगिरी बजावली.
या स्पर्धेत युवराज कदम, जयेश जाधव, भार्गव वाईकर, कृष्णा धामी, राज जाधव, निर्वी शुक्ला, अजिंक्य सिंग, अंश कदम, सोहम गवारी, नयन सोनवणे या खेळाडूंचा संतोष स्पोर्टस क्रिकेट अकादमी संघात समावेश होता.

वंश मोहिते हा कल्याणच्या संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमीच्या क्लबमध्ये नियमित सराव करतो. त्याचे प्रशिक्षक संतोष पाठक व आत्मा मलिक क्रिकेट अकादमीचे संचालक संदीप शिंदे, शर्मा व साई शिडीं संस्थानचे विश्वस्त सुहास अहिरे व संतोष स्पोर्टस क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षक मंगेश ब्रीद यांनी वंश मोहितेच्या खेळीचे कौतुक केले. या स्पर्धेत जिल्ह्यातील अव्वल १६ क्लब संघांना प्रवेश देण्यात आला होता. या प्रसंगी संतोष स्पोर्टस
क्रिकेट अकॅडमीचे संचालक संतोष पाठक व महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष राकेश पाटील उपस्थित होते.

स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू

• गोलंदाज साहस पाटील
■ फलंदाज वंश मोहिते
• यष्टिरक्षक: वेदिका कुंभारे


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here