नागपूर – राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा आज तिसरा दिवस आहे. आज विधानसभेत अवकाळी पाऊसामुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानावर चर्चा झाली. यावेळी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आक्रमक झाले.
“मी कोणावर टीका टीप्पणी केली का?, असा सवाल भास्कर जाधवांनी सभापतीने केला. भास्कर जाधव म्हणाले, “फडणवीसांनी चांगले निर्णय घेतले, त्याला मी चांगलेच म्हटले त्याचे पुढे काही झाले नाही का? याबद्दल बोलत होते. हे लगेच अडीच वर्ष अडीच वर्ष यांना त्याशिवाय दुसरे काही दिसत नाही. दादा महाविकासआघाडीत होते. आताही अजित दादा महायुतीच्या मंत्रीमंडळात आहेत. मी अजित पवारांना सात घालत आहे. दादा तुम्ही काही तरी पुढाकार घ्या, असे मी त्यांना म्हटले आहे. काय शिंदे गटाचे अडीच वर्ष अडीच वर्ष यांना सारखे अडीच वर्ष खुपत आहेत. माझ्या पक्षाची हामी मी घेतो की, अजित दादाना आता मुख्यमंत्री करा, तुम्ही एक लक्षात घ्या की, ज्या ज्याच्याशी मैत्री कराल, त्याचे वाटोळे कराल.
“सारखे अडीच वर्ष अडीच वर्ष ते अजून अडीच वर्षातून बाहेर पडले नाही”, असा टोला भास्कर जाधव यांनी शिंदे गटावर केली आहे.
भास्कर जाधव म्हणाले, “सारखे अडीच वर्ष अडीच वर्ष ते अजून अडीच वर्षातून बाहेर पडले नाही. कोरोना काय तुम्ही अणलाय की काय? तुम्ही का? कोरोना तुम्ही आणलात, तुम्ही कोरोना का आणलात? तुम्ही वेळवर प्लाईट का बंद केले नाही. कोरोना तुमच्यामुळे आला आणि महाराष्ट्र ठप्प झाला. तुम्हाला कोणी बोलत नाही म्हणून काय? असा सवाल उपस्थित करत भास्कर जाधव आक्रमक झाले होते.
मविआच्या कोविड काळातील कामाचे सर्वत्र कौतुक
महाविकास आघाडीच्या कोविड काळातील कामाचे सर्वांनी कौतुक केले, यासंदर्भात बोलातना भास्कर जाधव म्हणाले, “तुम्हाला ठाण्यातच सर्व काही दिसते. तुम्हाला सगळीकडे खाण्याचे दिसते दुसरे काही दिसत नाही. हे खालले, ते खालले तुम्हाला दुसरे काही दिसत नाही. तुमच्या पोटात दुखते. तुमच्या युपीतील प्रेते रस्तावर होती. मध्य प्रदेश आणि गुजरातीची रस्त्यावर होती आणि महाराष्ट्रात सन्माने अंत्यविधी होत होते. WHOसारख्या संघटानने सर्वोच्च न्यायालयाने, संसद, राष्ट्रपतीने संपूर्ण जगाने महाराष्ट्राचे कौतुक केले”, असेही भास्कर जाधव यांनी सांगितले आहे.