खेड – भरणे येथील श्री देवी काळकाई मंदिराच्या अध्यक्षपदी श्री सचिन जाधव यांची निवड झाल्याबद्दल देवस्थानच्या वतीने त्यांचा आज सत्कार करण्यात आला.
भरणे येथील प्रसिद्ध श्री देवी काळकाई मंदिरात अध्यक्ष म्हणून सचिन रामकृष्ण जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर राजाराम पांडुरंग बैकर यांची सल्लागार व प्रशांत पांडुरंग चव्हाण यांची कार्यकारणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली.सचिन जाधव ,प्रशांत चव्हाण व राजाराम बैकर यांचे श्री गंगाराम महाडिक(उपाध्यक्ष), सुजित शिंदे(सचिव),शेखर घरटकर (सहसचिव), महेश जगदाळे(खजिनदार),मधुकर शिंदे,प्रवीण गायकर,प्रभाकर आंबेडे,सुनील चिले,मनोहर चिले,अशोक बाईत,सुरेश भुवड,मोतीराम भुवड हे कार्यकारणी सदस्य यांनी अभिनंदन केले.