रत्नागिरी – काही लोक खरे बोलण्याचा आव आणतात. मी कधीही खोटे बोलत नाही. योग्य वेळी करारा जवाब मिलेगा असा घणाघात रत्नागिरीतील प्रसिद्ध उद्योजक व सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या कार्यकारी समितीचे संचालक किरण उर्फ भैय्या शेठ सामंत यांनी केला आहे.
काल गुरुवारी किरण उर्फ भैय्या शेठ सामंत यांनी आपल्या डीपिवर एक स्टेटस ठेवले होते. त्यावरून संपूर्ण राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या. त्यावरून आज शुक्रवारी किरण उर्फ भैय्या शेठ सामंत रत्नागिरीत व्यक्त झाले.
स्वतः चे ठेवावे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून अशी काही लोकांना सवय आहे. मी मात्र तसे करत नाही. मी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे. मी कधीही खोटे वागत नाही, खोटे बोलत नाही. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत भाजपा – शिवसेना युतीचाच उमेदवार निवडून येणार हे निश्चित आहे. मी ते स्टेटस बदलले त्याचे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्रास होऊ नये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या वर्षभरातच मी संपर्कात आलो आहे. या वर्षभरात च मला समजले की त्यांच्या इतका भावनिक माणूस कुणीही नाही. अशी प्रतिक्रिया उद्योजक किरण उर्फ भैय्या शेठ सामंत यांनी व्यक्त केली आहे.